०४९ सिद्धीचे साधन नेणती
सिद्धीचे साधन नेणती ।
ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥
तें रूप सांवळें देवकीये लीळे ।
भोगिती सोहळे कृष्णरूपें ॥२॥
उन्मनी अवस्था लाविती ते मुनी ।
अखंडता ध्यानीं कृष्णसुख ॥३॥
निवृत्ति ठकार श्रुतीचा आकार ।
गोपाळ साकार अंकुरले ॥४॥
सरलार्थ:
सिद्ध म्हणविणारेही या सिद्धीचे साधन जाणत नाहीत. आनंदाचा विशेष उद्बोधहि त्यांना माहित नाही ।।१।। ते सावळे रूप देवकीचे लाडके कृष्णरूपाने त्याचे सोहळे भोगत आहे ।।२।। मुनिजन उन्मनी अवस्था लावून अखंड श्रीकृष्णाचे ध्यान करतात ।।३।। निवृत्तिस सुंदर श्रृतिने वर्णीलेला आकार, अर्थ हाच गोपाळ श्रीकृष्णाच्या रुपाने साकार – मूर्त झाला आहे ।।४।।