१४६ गगनग्रास घोटी ब्रह्मांड हे पोटी

गगनग्रास घोटी ब्रह्मांड हे पोटी ।
निमुनियां शेवटीं निरालंबी ।।१।।
ते ब्रह्म सांवळे माजि लाडेंकाडें ।
यशोदामायेपुढे खेळतसे ।।२।।
ब्रह्मांडाच्या कोटी तरंगता उठी ।
आप आपासाठीं होत जात ।।३।।
निवृत्तिचें ध्यान यशोदेचे धन ।
वासुदेवखुण आम्हांमाजी ।। ४ ।।

सरलार्थ:

आकाशाचा घास घेवून हे ब्रह्मांडच पोटात घालून शेवटी स्वावलंबी अशा स्वरूपांत नाहिसे होऊन जाते ।। १।। ते भोळेभाबडे परब्रह्म या कृष्णरूपामध्ये लाडाने व कौतुकाने यशोदामातेच्या मागेपुढे खेळत आहे ।।२।। कोट्यावधी ब्रह्मांडे तरंगासारखे उठत असतात व आपणच आपल्या स्वरूपांत उत्पन्न होतात व नाहिसेहि होतात ।।३।। ते यशोदेचे धन हेच निवृत्तिचे ध्यान आहे. आमच्यामधील वासुदेव परमात्मा हीच त्याची खूण आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *