१६९ शांति क्षमा दया सर्वभावें करुणा

शांति क्षमा दया सर्वभावें करुणा ।
तोचि नारायणा आवडे दासु ॥ १ ॥
तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं ।
निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥ २ ॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य ।
ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥ ३ ॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे ।
नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥ ४ ॥
येउनि जनीं सदा पैं तो विदेही ।
तारकू सबाहीं सप्रेमळु ॥ ५ ॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा ।
करी शांति क्षमा तो विरळा असे ॥ ६ ॥

सरलार्थ:

भावार्थ:

ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती व करुणा भाव आहे असा भक्त भगवंताचा आवडता दास असतो. ज्याच्या ध्यान्यात सतत ती कृष्णमूर्ती असते त्याला लोकांनी साधु म्हंटले पाहिजे. जाच्या कडे जीव व शीवाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आहे व जो करुणेचा झरा आहे तोच धक्त धन्यत्वाला पोहचतो. जो भक्त सतत हरि नामाचा घोष करतो त्यालाच तो नारायण तारत असतो. जे महात्मे जनामध्ये विदेही अवस्थेत वावरुन त्यांना प्रेम देतात तेच जगाचे तारक होतात. निवृतिनाथ म्हणतात, जो सतत हरिनामाचा गजर करतो व शांती क्षमा आपल्या अंगी बाणवतो मी त्याच भक्तांचा महिमा सांगत आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *