२१३ तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित
तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित ।
त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥ १ ॥
सर्व पुण्य चोख आचरलों आम्हीं ।
तरिच ये जन्मीं भक्ति आम्हां ॥ २ ॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली ।
अखंड साउली कांसवदृष्टि ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल ।
भिवरा विठ्ठल दैवत आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
स्थूल सूक्ष्म व कारण अशा देहत्रयाचा, सत्वरज तम अशा गुण यांत लगोलग जीवांना जन्म घ्यावा लागतो ॥१॥ मात्र आम्ही सर्व चोख निर्मळ पुण्याचे आचरण केल्याने या जन्मात आम्हांस भक्तिचा लाभ झाला ।।२।। शान्ति, क्षमा, दया व वृत्तिशून्य माऊली आई तिची कासव दृष्टिने आम्हावर साऊली आहे ।।३।। श्रीनिवृत्ति म्हणतात तेच आमच्या जीवनाचे मोल आहे. भिवरातिरावरील विठ्ठल हे आमचे दैवत आहे ।।४॥
भावार्थ:
चातक पक्षी जसा मेघांची आतुर होऊन वाट पाहतो तसेच आतुर आहे होऊन आम्ही नारायणाचे ध्यान करतो. चकोराला चंद्राकडुन जसे अमृत मिळते तसे तो आम्हा भक्तांसाठी दुमत असतो ते गोपाळनाम कामधेनु चे दुभते मिळाले की वैकुंठीची विश्रांती आम्हाला लाभते. तो चिंतामणी होऊन आम्हा बरोबर एकविध झाल्यामुळे आमचे आशापाश तुटले आहेत व त्याच्या शिवाय कोणतेही कर्तव्य उरले नाही. आमच्या जीवनदायी वायुच्या गतीलाही त्याच्यामुळे विश्रांती मिळते. त्यामुळे नाम, रूप व जातीचे भेद मावळले. त्याचे नामरुपाचे अमोघ धनाची पर्वणी आम्ही साधली त्यामुळे त्या श्रीकृष्णाने आम्हाला तुप्त केले. निवृत्तिनाथ म्हणतात, आम्ही द्वैत सांडुन अद्वैत साधल्यामुळे तो हरिच सर्व व्यापला आहे रिता ठाव नाही ही अनुभुती प्राप्त झाली.