२२५ चंदनाचे झाड परिमळे वाड

चंदनाचे झाड परिमळे वाड ।
त्याहूनि कथा गोड विठ्ठलाची ॥१॥
परिमळु सुमनीं जाई जुई मोगरे ।
त्याहुनि साजिरे हरि आम्हां ।।२।।
आम्हां धर्म हरि आम्हां कर्म हरि ।
मुक्ति मार्ग चाही हरि आम्हां ।।३।।
कल्पतरु आम्हा इच्छेसि सागरु ।
त्याहुनि आगरु हरि माझा ।।४।।
निवृत्ति सुवासु ब्रह्मींचा प्रकाशु ।
विठ्ठल रहिवासु आम्हां पुरे ॥५॥

सरलार्थ:

चंदनाचे झाड हे सुगंधाने मोठे असते. त्यापेक्षाहि हि विठ्ठलाची कथा गोड व व्यापक आहे ।।१।। सुगंध हा जाई, जुई, मोगरा या वेलिंच्या फुलात असतो. त्यापेक्षाहि श्रीहरि आम्हाला महान वृक्षच आहे. आता आमचे धर्म-कर्म हरिच झाला आहे व चारहि मुक्तिचा मार्ग तोच झाला आहे. ।।३।। इच्छेचा सागर असा तो आम्हाला कल्पतरू आहे. त्यापेक्षाहि हरि हा कल्पनेचा आगर-सांठाच आहे ॥ ४ ॥ परब्रह्म स्वरूपाचा प्रकाश हाच निवृत्तिचा सुगंध आहे. विठ्ठल स्वरूपी सतत वास हेच आम्हास पुरे आहे ॥५॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *