२२६ पुरूष प्रकृति नांदताती घरी
पुरूष प्रकृति नांदताती घरी ।
अखंड शेजारीं ब्रह्मसुखें ॥१॥
नाहीं माया भुलीं प्रपंच अबोला ।
ब्रह्मसुखें घाला रहिवासु ।।२।।
विषयगरळा टाकिला अभिमानु ।
सर्व जनार्दन आम्हांघरी ।।३।।
निवृत्ति परि प्रकृति पुरुष नांदती ।
सर्वत्र श्रीपति होउनि ठेला ।।४।।
सरलार्थ:
पुरूष व प्रकृती हे एकाच घरी देहात सतत शेजारी ब्रह्मानंदाने नादतात ।।१।। त्यांना प्रपंचाचा भ्रम नसून त्या विषयी ते अबोल आहेत. त्यांचा तो रहिवास – राहणे ब्रह्मसुखाने तृप्त झाले आहे ।।२।। त्यांनी विषयाचे विष व अभिमान दोन्हीहि टाकले आहे. आमच्या जीवनांत सर्वच जनार्दन झाले आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात असे हे प्रकृतिपुरुष नांदतात व आम्हाला मात्र सर्वच ठिकाणी तो लक्ष्मीपतिच होऊन राहिला आहे ।।४।।