२२९ ज्ञानघनमुक्ति विज्ञान धन संपन्न

ज्ञानघनमुक्ति विज्ञान धन संपन्न ।
सर्वघटीं चैतन्य हरि नांदे ॥१॥
त्या रुपें मोहिलें काय करू साजणी ।
अखंड उन्मनि लागे त्यासि ॥२।।
समाधि संजीवन कृष्णाचें पै ध्यान ।
दिननिशि मनीं रूप दिसे ॥३॥
निवृत्ति घनदाट स्वामी माझा दिसे ।
येकतत्त्व पैसे शोभतुसे ॥४॥

सरलार्थ:

ज्ञानविज्ञानाने दाटून भरलेली मुक्ति संपन्न श्रीहरि सर्वभूतमात्रामध्ये चैतन्यरूपाने नांदत आहे ।।१।। अग बाई ! त्या श्रीहरिरूपाने मला मोहून टाकले त्याला काय करू ? त्याची मला अखंड उन्मन अवस्था लागते ।।२।। श्रीकृष्णाचे ध्यान ही संजीवन समाधी आहे. रात्रंदिवस आत्मरूपच दिसते ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात- माझा स्वामी मला सर्वत्र दाटून भरलेला दिसतो. एकत्वाचाच हा विस्तार शोभून दिसत आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *