२३२ आम्हीं बोध तुम्हीं बुद्धि
आम्हीं बोध तुम्हीं बुद्धि । आम्हीं स्वयें तुम्हीं शुद्धि ।। १ ।।
देहीं देह हरि । सर्व नांदे चराचरीं ॥ २ ॥
आम्हीं सोहं धरूं भावें । तुवां हृदयींच ठसावें ।। ३ ।।
निवृत्ति पाठ पदा । नामें वैकुंठ सदा ॥ ४ ॥
सरलार्थ:
आम्ही बोध असून तू बुद्धी आहेस आम्ही स्वयंशूद्ध व तू शुद्धी आहेस || १ || आम्ही देही तू श्रीहरि देह कसा बरे आहेस ? सर्व चराचर विश्वात तूच नांदत आहे ।।२।। आम्ही भावनेने सोहंभाव धरावा व तू मात्र हृदयातच स्थिर राहावे ।।३।। त्या हरिचे स्थान हा निवृत्तिचा पाठ-अभ्यास आहे. तेच आम्हाला सदैव वैकुंठ स्वरूप आहे. ।।४।।