२३६ मी माझी कल्पना नाही
मी माझी कल्पना नाही, मज सवे । दिननिशीं उगवे हरि माये ।। १ ।।
हरि विण दुजे न देखे त्रिभुवनी । नायकिजे कानीं भेदबुद्धी ॥ २ ॥
वेदीं ठेलें कर्म शास्त्रासी मोहन । शेषासि अनुमान नकळे माये ।। ३ ।।
निवृत्तिदेवी घर हरी आमुचा माये । हरि एक पाहे विश्वरुपी ॥ ४ ॥
सरलार्थ:
मी व माझेपणाची कल्पना आता माझ्या बरोबर नाही. कारण रात्रंदिवस श्रीहरिच प्रगट दिसत आहे ।। १ ।। त्या श्रीहरि शिवाय यैलोक्यात मला कोणीच दिसत नाही ॥२॥ वेदाचे जाणण्याचे कर्म थांबले, शास्त्रास तर संभ्रम निर्माण झाला व शेषास त्याचे अनुमानच कळेना ||३|| पण अग बाई तो श्रीहरि आमचे घरच झाला आहे. सर्व विश्वरुपात त्यालाच आम्ही पाहत आहोत. असे श्री निवृत्तिनाथ म्हणतात ||४||