२३८ भावभक्ति प्रेम दया शांति क्षमा
भावभक्ति प्रेम दया शांति क्षमा । अखंडित प्रेमा असों द्यावा ।। १ ॥
सर्वभूतीं भजन करावें सर्वथा । रामनामकथा आरंभाव्या ।। २ ।।
आपपर देहीं विचार करावा । हरिनामें दोहावा सर्वारूपी || ३ ||
निवृत्तिचें जाप्य आनु नांही चिंत्ती । रामनामें तृप्ती सदा असे ॥ ४ ॥
सरलार्थ:
भाव, भक्ती, प्रेम, दया, शान्ति व क्षमा व अखंड प्रेम असू द्यावे ॥ १ ।। सर्व भूतामध्ये भगवन्त आहे असे समजून संपूर्ण भजन करावे व रामनामाच्या कथा हि आरंभ कराव्यात ।। २ ।। आपल्या व दुसऱ्याच्या देहातहि विचार करावा व सर्व रूपांत हरिनामाचे दोहन करावे ।। ३ ।। निवृत्तिच्या चित्तांत दुसरा जप थोडाहि करण्याचा विषय नसून रामनामातच हट्ट ही ते चित्त सदैव संतुष्ट आहे ॥ ४ ॥