२४० हरि प्रेम नित्य ज्यासी पैं वसे

हरि प्रेम नित्य ज्यासी पैं वसे । सर्वघटीं दिसे हरि माझा ।। १ ।
रामकृष्णमाळा नित्य जप करी । तयासि संसारी सुख आहे ॥ २ ॥
अतीचिये वेळे रामनाम जोडी । वैकुंठ परवडी तया नरा || ३ ||
निवृत्ति अखंड हरीध्यान चित्तीं । संसार समाप्ति जाली तया ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्याच्याजवळ श्रीहरिचे प्रेम नित्य राहते त्याला सर्व शरीरांत एक व्यापक श्रीहरी आत्मरूपाने दिसतो ।। १ ।। रामकृष्ण हरि या माळेचा जो नित्य जप करतो. त्याला संसारात सुखच आहे ।। २ ।। अन्तःकाळी ज्याच्या मुखात रामाचे नाम येते त्या मनुष्यास वैकुठांची प्राप्ती होते ।। ३ ।। निवृत्तिच्या चित्तात अखंड हरिचे ध्यान असल्याने त्याच्या जन्ममरणरूप संसार दुःखाची समाप्ति-शेवट झाला आहे. ।। ४ ॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *