२४१ नाम मुखीं सदा तोचि पै भाग्याचा

नाम मुखीं सदा तोचि पै भाग्याचा । तयासी यमाचा धाक नाहीं ॥ १ ।।
रामनाम हरि सर्वकाळ वसे । तेथेंचि वसे हरि ।। २ ।।
हरिध्यान वसे अखंड पै सर्वदा । न पवे तो आपदा इये जनीं ।। ३ ।।
निवृत्ति समता हरिभजन करी। सर्वत्र कामारी ऋद्धिसिद्धी ॥ ४॥

सरलार्थ:

ज्याच्या मुखात सदैव नाम आहे तोच भाग्यवान आहे. त्याला आता यमराजाचा धाक मुळीच नाही ।। १ ।। राम राम या नात्याने हरि सर्वकाळ ज्याच्या जीवनात राहतो. तेथेच तो श्रीहरि सदैव वास करतो ।। २ ।। ज्याच्या चित्तांत सदैव हरिचे ध्यान आहे. तोच जगात संकटात सापडणार नाही ।। ३ ।। निवृत्ति म्हणतात समभावाने हरिचे जो भजन करतो. त्याला सर्व ठिकाणी ऋद्धि सिद्धि काम करण्याच्या दासी म्हणून जवळ येतात ।। ४ ।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *