२४६ नाम नाही वाचे तो नर निर्देव
नाम नाही वाचे तो नर निर्देव । कैसेनी दैव फावेल तया ।। १ ।।
जपे नाम वाचे रामनामपाठें । जाशील वैकुंठे हरि म्हणतां ।। २ ।।
न पाहे पैं दृष्टी कळिकाळ तुज । रामनाम बीज मंत्रसार ।। ३ ।।
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता । आपणची तत्त्वता होईल हरी ।। ४ ।।
सरलार्थ:
ज्याच्या मुखात नाम नाही तो नर निर्देवी असून त्यास दैव कसे प्राप्त होईल. ||१|| जो रामनामाच्या पठणाने वाणीमध्ये नामजप करतो. तो हरी म्हणताच, वैकुंठास जाईल ।।२।। कळिकाळ तुझ्याकडे दृष्टीने पाहणार नाही. रामनाम हे बीजमंत्र सार रूप आहे. ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात नित्य नाम जप करावा, त्याने आपणच तत्वतः हरिरूप होऊन जाऊ ।।४।।