२५७ कामना कामिक वासना तार्किक

कामना कामिक वासना तार्किक । रजतम सात्विक ऐक्यरूप ।। १ ।।
तें हें कृष्णमयें कृष्णनामें खेळे । भक्तीभावलळे पोशीतसे ॥ २ ॥
नित्य तें अनित्य आपणचि सत्य । कार्याकारण कृत्य हरपे जेथें ॥ ३ ॥
निवृत्तिचे ध्यान धारणा विवर । सर्व रूपें घर वैकुंठ माझें ॥ ४ ॥

सरलार्थ:

कामुक भावनेतून कामना व तर्कातील वासना हे रज व तमोगुणाचे कार्य असून हरिचे एकरूप हा सत्वगुण आहे. ॥१॥ त्या कृष्णरूप कृष्णनामाच्या जोरावर आम्ही शुध्द असा भक्तिभाव पुष्ट करीत आहोत. ||२|| जे नित्य वाटते ते अनित्य असून आपणच सत्यस्वरूप आहे. कार्य कारणाचे कार्य जेथे नाहिसे होते ।।३।। निवृत्तिस आतां ध्यान व धारणाचा विसर पडला असून सर्वांगाने वैकुंठ हेच घर झाले आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *