२५९ न लगती धने असार संपत्ती
न लगती धने असार संपत्ती । वायांचि गुंफती वासना रया ॥ १ ॥
सार हरिनाम सार हरिनाम । नित्यता सप्रेम जपों आम्ही ॥ २ ॥
ध्येय ध्यान स्थिर मनाचा सांठा । नामेंचि वैकुंठा भक्त गेले ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर रामनाम चित्तीं । एकानामें तृप्ति सर्वकाळ ॥ ४ ॥
सरलार्थ:
नाना प्रकारची धने व हि असार संपत्ति कांही लागत नाही अरे राजा त्यांच्यात व्यर्थच वासना गुंतून जातात ।।१।। एक हरिनामच सार असून आम्ही त्याचाच प्रेमयुक्त जप करतो ॥२॥ ध्येय व ध्यान हा मनात साठा करून भक्तजन वैकुंठास गेले आहेत. ||३|| निवृत्ति सावधपणे रामनामच चित्तात ठेवीत आहे. एका रामनामानेच सर्वकाळ तृप्तिचा लाभ होतो. ।।४।।