२६० शान्तिचे भजन क्षमेचा कळवळा

शान्तिचे भजन क्षमेचा कळवळा । गोपाळ सकळां देहीं नांदे ॥। १॥
आचार पवित्र नामचि पै पात्र । सांठविले शास्त्र दों अक्षरीं ॥ २ ॥
रुपाचे सगुण निर्गुण दाटलें । नामेंचि आटलें मोहजाळ ॥ ३ ॥
निवृत्ति पडळ उडालें पै भान । गयनिनें ज्ञान उपदेशिलें ॥ ४ ॥

सरलार्थ:

सर्वाभूती सम परमात्मा असल्याने शान्त स्वभावाने सर्वांशी वागणे हेच भजन असून सर्वांच्या कळवळ्याने क्षमावृत्ति ठेवावी ।। १ ।। योग्य असे हे नामच पवित्र आचार आहे. दोन अक्षरांनी अक्षर परब्रह्म सांठविले आहे. ।।२।। सगुण रूपांत दिसणारे हे परमतत्व निर्गुण स्वरूपाने सर्व विश्वांत दाटून भरले आहे. त्यांचे नाम घेतल्याने मोहाचे जाळे आटून ||३|| गेले || ३ || निवृत्तिचा विपरीत ज्ञानाचा पडदा उटून गेला गहिनी गुरूंच्या ज्ञानोपदेशाने हे सर्व घडले ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *