२६२ शून्य साकार घरी जीवशिव काष्टी

शून्य साकार घरी जीवशिव काष्टी । मीपणासि तुटी एक्यनामें ॥ १ ॥
तें हें नाम सोपें रामकृष्णमाळ । यासि काळवेळ नाहीं नाहीं ॥ २ ॥
शून्य हेंही ठाये जीव जिवीं । मन हें माधवीं हरपत ॥ ३ ॥
निवृत्ति निमग्न शून्याकार घट । गुरुनामें मठ तेथें केला ॥ ४ ॥

सरलार्थ:

निराकार शून्यात साकारलेला घट – देह-जीवन शीव लाकडामध्ये एका हरिनामानेच मीपणाची तुटी होऊन तो नाहिसा झाला. ।।१।। ते हे रामकृष्ण माळारूप नाम सोपे असून याला काळ वेळ व स्थळाचे बन्धन मुळीच नाही. ।।२।। शून्यही आपल्या अधिष्ठानात नाहिसे होते व जीव हा शिवात लीन होऊन जातो. मन माधवरूप परमेश्वरांत नाहिसे होते. ॥३॥ त्या शून्याच्या आकाराने असलेल्या घटात निवृत्ति निमग्न झाला आहे. त्याने गुरूच्याच नावाने तेथे मठ-वास्तव्यस्थान निर्माण केला आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *