२७४ नाममंत्रसार नित्य निरंतर
नाममंत्रसार नित्य निरंतर । येणेंचि संसार तरे जाणा ।। १ ।।
एकेविण दुजें नाहीं नाहीं सहजें । नाम मुखें भोज घेईजेसु ॥ २ ॥
निवृत्ति म्हणे पारु विठ्ठलउच्चारु । तयाचा संसारु मोक्षरूप ॥ ३ ॥
सरलार्थ:
नित्य अखण्ड सारस्वरूप नाममंत्रानेच संसारातून तरून जाता येईल हे ध्यानी घ्या ।।१।। एका नामाविण दुसरे सोपे असे काहीच नाही म्हणून नाम मुखाने अति आवडीने घ्यावे ।।२।। निवृत्तिमहाराज म्हणतात विठ्ठल नामाचा उच्चारच संसार पार करतो नव्हे तो संसारच मोक्षमय होतो. ।।३।।