२७६ प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही सहज

प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही सहज । जनीं वनीं काज करुनी असती ॥ १ ।।
नारायणनाम जपतांचि दोन्ही । एकतत्त्वींकरणीं सांगिजे गुज ॥ २ ॥
आशेचे विलास गुंफोनि महिमा । तत्त्वीं तत्त्व सीमा निज ज्ञानें ॥ ३ ॥
निवृत्ति तत्त्वता मनाचें मोहन । नित्य समाधान रामनामें ॥ ४ ॥

सरलार्थ:

प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही स्वाभाविक वृत्ति जनात व वनांतहि आपले काम करीत असतात. ।।१।। मात्र नारायण नामाचा जप केला तर दोन्ही एका तत्त्वातच येतात हे गुजवर्म संतांनी सांगितले आहे. ॥२॥ आत्मज्ञानाने आशेचा विलास व महिमा गुंडाळून एका परम तत्त्वातच तत्त्व सिमीत-मर्यादित होते. ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – मनाचे तात्विक मोहन जे अशा रामनामाने सदा समाधान प्राप्त होते ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *