२८० मन गेले देवी ध्यान गेले रूपी

मन गेले देवी ध्यान गेले रूपी । राहिलें स्वरुपीं तल्लीन देखा ॥ १ ॥
सुखदुःख नाहीं सुखदुःख नाहीं । नाम मात्र पाहीं हरि वोळें ॥ २ ॥
एकतत्त्व सार रामनाम सुख । नलगे ते भूक प्रपंचाची ॥ ३ ॥
निवृत्ति सत्त्वर उच्चारण नाम । वैकुंठधाम तया देहीं ॥ ४ ॥

सरलार्थ:

मन हे देवात विलीन झाले व ध्यान हे रुपात स्थिर झाले असून स्वरूपांत तद्रूप होऊन राहिले आहे ||१|| केवळ रामनामाने हरिप्रसन्न झाला तर सुखदुःखे मुळीच अनुभवास येत नाही ।।२।। रामनामातच सुख आहे हेच एक सारतत्त्व आहे. मग प्रपंचाची भूकच राहत नाही हव्यास राहत नाही || ३ || निवृत्तिनाथ म्हणतात हरिनामाचे उच्चारण लवकर करावे त्या देहात वैकुंठ स्थानच प्राप्त होते ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *