२८१ एकतत्त्व हरि असे पै सर्वत्र

एकतत्त्व हरि असे पै सर्वत्र । ऐसे सर्व शास्त्र बोलियेलें ॥ १ ॥
हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरे । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २ ॥
जपतां पै नाम यम का कांपे । हरि हरि सोपें जपिजेसु || ३ ||
निवृत्ति म्हणे हरिनाम पाठ जप । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४ ॥

सरलार्थ:

सर्व ठिकाणी एक हरि हेच तत्त्व आहे असे सर्व शास्त्रांत सांगितले आहे ।। १ ।। हरिनामानेच उद्धार होईल म्हणून वेगाने तू हरिनामाचा त्वरित जप कर ।। २ ।। हरिनामाचा जप केला असता यमहि कांपतो म्हणून सोपे असलेल्या हरिनामाचा जप कर ।। ३ ।।
निवृत्तिनाथ म्हणतात – हरिनामाचा जप करा त्यामुळे पुढील जन्माच्या खेपा दूर होतील. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *