२८२ जपता कुंटिणी उतरे विमान
जपता कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ।। १ ।।
नारायण नाम तारक हे आम्हां । नेणो पै महिमा अन्य तत्त्व ।। २ ।।
तारिले पतीत नारायण नामें । उद्धरिलें प्रेमें हरिभक्त ।। ३ ।।
निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशीं प्रेम हरि हरि ॥ ४ ॥
सरलार्थ:
वेश्येने मुखात नारायणाचे नाम येवून जप केला असता तिच्या दारात वैकुंठाचे विमान उतरले ||१|| नारायण नामच आम्हाला तारक असून असा महिमा आम्ही दुसऱ्या तत्त्वात जाणत नाही ।।२।। या नारायण नामाने पापी जनांना तारले व हरिभक्तांना या नामप्रेमाने उद्धरून नेले ॥३॥ निवृत्तिचा उच्चार नारायण नाम आहे. हरि हरि या नामावरच त्याचे रात्रंदिवस प्रेम आहे ॥४॥