२८६ संसार सुफळ नाम उच्चारितां

संसार सुफळ नाम उच्चारितां । येऱ्हवीं मता अधोगति ॥ १ ॥
संसर असारु श्रीपति साचारु । नामेंविण पारु न पविजे ॥ २ ॥
हरिहरिं म्हणतां उतरले पार । दुर्धर संसार तरले रया ।। ३ ।।
निवृत्तिचा जप हरी हा उच्चार । संसार सागर तारक हरि ॥ ४ ॥

सरलार्थ:

हरिनामाचा उच्चार केल्याने जन्ममरण रूप संसार सफल होतो. त्याशिवाय मरण आले तर अधोगतीच होते ।। १ ।। संसार हा असार असून लक्ष्मीपती परमात्माच सत्य आहे. त्याच्या नामाशिवाय संसाराच्या पार होता येणार नाही ।। २ ।। अरे बाबा हरि हरि म्हणूनच तरून पलिकडे गेले व कठीण असा संसार ते तरले ।। ३ ।। हरिनामाचा उच्चार हाच निवृत्तिचा जप असून तो श्रीहरिच संसारातून तारणारा आहे ।। ४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *