२८९ देही देव आहे हे बोलती वेद
देही देव आहे हे बोलती वेद । परि वासनेचे भेद न दवडिती ।। १ ।।
वासना पै चोख तेथेंचि वैकुंठ । भावेचि प्रगट होये जना ।। २ ।।
नलगती सायास करणें उपवास । नाममात्रें पाश तुटे जना ।। ३ ।।
निवृत्ति पाहातु देहामाजि प्रांतु । देवोचि दिसतु सर्वांघटीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
देहातच देव आहे हे वेद बोलतो हे खरे पण वासनेचे भेद मात्र माणसे बाहेर टाकत नाही ।।१।। निर्मळ, शुद्ध वासना तेथेच वैकुंठ श्रीहरि राहतो आपापला भावच प्रत्येक माणसाला प्रगट होतो ।।२।। अरे जना! मोठे कष्ट किंवा उपवास नको केवळ नामानेच बंधने तुटून जातात ।।३।। निवृत्ति तो भाग देहातच पाहतो व सर्वांभूती त्याला देवच दिसतो ।।४।।