२९३ अपशब्द कानी पडताचि द्वैत

अपशब्द कानी पडताचि द्वैत । नाम हें अच्युत नये रया ।। १ ।।
परनिंदा पीडा करिताचि मूढा । पडिलासि मूढा योनिमाळें ।। २ ।।
आपस्तुति नको आपपर एको । विष्णुपणें लोपो भान तुझें ।। ३ ।।
निवृत्ति तत्पर द्वैत हें निरसी । अद्वैतसमरसीं दिधला असे ॥। ४ ॥

सरलार्थ:

परनिंदात्मक वाईटशब्द कानावर पडताच द्वैत प्राप्त होते व त्याच्या मुखात अद्वैतस्वरूप अच्युत हे नाम येत नाही. ।।१।। अरे मूर्खा परपीडा व परनिंदा करताच लक्ष्यावधी योनींची माळा गळ्यात पडते. अनंतयोनींचा फेरा पडतो ।।२।। आपली स्तुति व आपपरभाव नको. तर एकच विष्णु आहे या ज्ञानाने तुझे हे द्वैतभान नाहिसे होवो ||३|| निवृत्ति हा त्वरितच द्वैताचा निरास करून अद्वैतस्थितीत त्याला ठाव दिला आहे ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *