२९५ वासनेचे द्वैत सांडोनि परते

वासनेचे द्वैत सांडोनि परते । अद्वैता असते भोगी हरि ।। १ ।।
दुजियाची सृष्टि नाहीं नाहीं भिन्न । सर्व नारायण बिंबलासे ॥ २ ॥
आत्मरुपें जन मनीं कारे मुढा । होसी माजीवडा ब्रह्मामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे द्वैत सांडी सांडी कथा । अद्वैत अच्युता नित्य सेवी ॥ ४ ॥

सरलार्थ:

द्वैत दूर टाकून अद्वैतस्वरूप असा जो हरि त्याचा उपभोग घे ।। १ ।। द्वैतपणाची सृष्टि मुळीच वेगळी नाही सर्व रूपाने नारायणच नटला आहे. ।।२।। अरे मूर्खा सर्व जन आत्मरूपाने मान ना ? त्यामुळे तू ब्रह्मामध्ये सामावून जाशील || ३ || निवृत्तिनाथ म्हणतात- तू द्वैताची गोष्ट सर्व टाकून दे व अद्वैतस्वरूप अनंताची नित्य सेवा कर ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *