३०० दिसे वरिवरी नाम अवघे वैकुंठ धाम
दिसे वरिवरी नाम अवघे वैकुंठ धाम । जप तो शिव वर्म रामनामें ।। १ ।।
ते रूप समरस गोकुळीं हृषीकेश । नंदाघरीं गोपवेषें हरि खेळे ॥ २॥
समाधिधनधाम वैकुंठ हरिसम । योगियां पूर्णिमा हृदयीं सदा ॥ ३ ॥
निवृत्तिने कथिले गुरुगयनी प्रसादें । सकळ हा गोविंद आत्माराम ।। ४ ।।
सरलार्थ:
वरवर पाहता नाम दिसते पण खरे ते संपूर्ण वैकुंठस्वरूपच आहे. असे ते धर्म असल्याने भगवान शंकर त्या रामनामाचा जप करतो ।। १ ।। ते ऋषीकेश श्रीहरिचे रूप गोकुळांत समरस होऊन नंदाच्या घरी गोप वेषात तो हरि खेळत आहे ।।२।। समाधि धनाचे ठिकाण व वैकुंठा सारखा तो पूर्ण काम हरि योग्यांच्या हृदयात सदैव राहात आहे ।।३।। हे गुरुगहिनी प्रसादाने निवृत्तिने सांगितले आहे ॥४॥