३०१ भाग्ये विण नसे जना भाव वसे

भाग्ये विण नसे जना भाव वसे । तेथें सर्व दिसे हरि माझा ॥ १ ॥
फळलें अमूप कृष्णनाम रुप । उच्चारित खेप हरे जनां ।। २ ।।
नंद ते यशोदा देवकी मुकुंदा ॥ वसुदेव सदां भाग्यानिधी ॥ ३ ॥
निवृत्ति संपूर्ण गुरुमुखें खुण । भाग्येंविण जाण नये मुखा ॥ ४ ॥

सरलार्थ:

अगबाई ! जनामध्ये भाग्यावाचून देवभाव वसत नाही त्याभावात हरिरूपच दिसते ।।१।। कृष्ण नामाचे तप अमापरित्या फळास आले. त्याचा उच्चार केला असता जन्ममरणाची खेप नाहिसी होते ॥ २ ॥ नंद यशोदा देवकी मुकुंद वसुदेव हे सदैव-भाग्यवंत आहे ||३|| निवृत्तिस हे वर्म गुरुमुखाने सर्वपणे कळले ते भाग्याशिवाय मुखात येत नाही. हे निश्चित समजा. ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *