३०२ नि:संदेह हरि भावयुक्त करी

नि:संदेह हरि भावयुक्त करी । भजन निर्धारी संतशीळ ॥ १ ॥
रज तम खंडी वासना हे मुंडी । चित्त हें अखंडी हरिपंथीं ॥ २ ॥
साधन हरिपंथु हाचि निज हेतु । गुरु मुखें मातु ऐशी असे ।। ३ ।।
निवृत्तिचे धन हरि आत्मा जाण । हरि हाचि पूर्ण जनकु रया ॥ ४ ॥

सरलार्थ:

तूं संशयरहित होऊन श्रद्धायुक्त मनाने सत्वशील होऊन निश्चयाने भगवंताचे भजन कर ।।१।। रज तमांचे खंडन करून वासना संपूर्ण नष्ट कर व चित्तास सदैव हरिच्या मार्गात लाव ||२|| हरिचा मार्ग हेच साधन आत्मप्राप्तिचे कारण आहे. गुरुमुखातून हीच गोष्ट सांगितली आहे. ।।३॥ हरि हाच आत्मा आहे हेच निवृत्ति धन असून तोच त्याचा माता-पिता आहे. ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *