३०३ सुख-दुःख कांही भजन प्रवाही
सुख-दुःख कांही भजन प्रवाही । मायामोह पाही हरी रया ।। १ ।।
हरिरुपीं सुख हरिरुपीं दुःख । हरिरुप शोक आत्मा माझा ॥ २ ।।
साकार निराकार सर्व हा आचार । हरिरूप सार भजनभाव ॥ ३ ॥
निवृत्तिचें ज्ञान हरिरूप ध्यान । मनाचें उन्मन हरिरुपीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
अरे राजा! या भजन मार्गात सुख-दुःख हे कांही नसून माया मोह हे हरिरूपच होतात ।।१।। माझे सुख दुःख, व शोक आणि आत्मा हे सर्व हरिरूपच आहेत ॥२॥ आकारवान व निराकारस्वरूप हा सर्व आचार हरिरूपअसून भक्तिभाव हे त्याचे सार आहे. ।। ३ ।। निवृत्तिचे ज्ञान व ध्यान हि हरिरूप असून मनाची उन्मनस्थितीहि हरिरूपच आहे ।।४।।