३०५ द्वेषिता अनंता द्वेषता पूर्णता
द्वेषिता अनंता द्वेषता पूर्णता । नपवे अनंता भाव त्याचा ।। १ ।।
भावेंशींल काज भावें अधोक्षज । भावें सकळ काज सफळ होय ॥२॥
भाविक भजन भाविक पूजन । तेथें जनार्दन तुष्टतसे ।। ३ ।।
निवृत्ति करुणा भाव नारायणा । सर्व जनार्दना अर्पियेलें ॥ ४ ॥
सरलार्थ:
अनंताचाच द्वेष केला तर पूर्णच द्वेष होतो त्याचा भक्तिभाव अनंतास कधीच प्राप्त होणार नाही ।।१।। भावशील कामाने व भावयुक्त भावानेच नारायण अधोक्षजाची प्राप्ति होते. भक्तिभावानेच सर्व कार्य सफल होते ।। २ ।। भावयुक्त मनाने भजन व पूजनाने श्रीजनार्दन संतुष्ट होतो ।। ३ ।। निवृत्तिनाथाने सर्व करुणाभाव भगवंत जनार्दन नारायणास अर्पण केला ॥ ४ ॥