३०६ पितृगोत माता भजन स्वभावता

पितृगोत माता भजन स्वभावता । जन्मोनि अनंता प्रिय होये ।। १ ।।
तोचि भजनपंथ सुगम समर्थ । नित्यता अनंत तृप्त असे ।। २ ।।
पितृमाता विष्णु एक भाव प्रभु । दिननिशीं कृष्णु न विसंबे रया ।। ३ ।।
निवृत्ति सादर कृष्ण परात्पर । माता पिता सार आम्हां होय ॥ ४॥

सरलार्थ:

जन्मास येवून मातापित्यांच्या गोतांचे स्वाभाविक भजन केले तर श्रीहरि अनंतास तू प्रिय होशील ।।१।। तोच भजनाचा सोपा व समर्थ मार्ग आहे. त्याने अनंत श्रीहरि नित्य तृप्त होतो ।।२।। माता व पिता हे एक प्रभु विष्णुच असून राजा रात्रंदिवस श्री कृष्णास विसरू नये ||३|| परात्पर अशा श्रीकृष्णाचे ठिकाणी निवृत्तिचा आदर असून माता व पिता हे आम्हाला सार सर्वस्व वाटतात ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *