३०९ तिमिर पडळे प्रपंच भासे

तिमिर पडळे प्रपंच भासे । झाकोळला दिसे आत्मनाथ ।। १ ।।
हरिविण दुजे चिंतिता निभ्रांत । अवघेंचि दिसत मायाभ्रम ।। २ ।।
सांडूनि तिमिर सर्व नारायण । हेंचि पारायण नित्य करी ॥ ३ ॥
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज । एक तत्त्व बीज जपा लाहो ॥ ४ ॥

सरलार्थ:

अज्ञानाच्या पडद्यावर प्रपंच भासतो व आत्मा स्वामी झाकल्या सारखा दिसतो. ।।१।। हरि वांचुन दुसरे चिंतन केले असता निश्चितच सर्व मायेचा भ्रम दिसतो ||२|| ते तिमिर अज्ञान टाकून सर्व नारायण परमात्माच आहे. हेच नित्य पारायण – आवर्तन नित्य कर ||३|| निवृत्तिनाथ म्हणतात – तुम्ही घाई करून त्या सज्जन व एकतत्त्व स्वरूप बिज अशा सर्व रूप आत्मराजाचा जप करा ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *