३१२ लटिका संसार वाढविसी व्यर्थ

लटिका संसार वाढविसी व्यर्थ । विषयाचा स्वार्थ झणें करीं ।। १ ॥
नको शिणों दुःखें कां भरसि शोकें । एकतत्त्वे एकें मना लावी ॥ ३ ॥
लावी उन्मनी टाळी टाळिसी नेई बाळी । अखंड वनमाळी हृदयघटीं ॥ ३ ॥
निवृत्ति चपळ राहिला अचळ । नाहीं काळ वेळ भजतां हरि ॥ ४ ॥

सरलार्थ:

हा खोटा संसार तू व्यर्थ वाढवून विषयांचा स्वार्थ करू नकोस ।। १ ।। दुःखाने तू शिणू नको विनाकारणच शोकाने कां व्यापून जातोस मनाला एकमात्र एकतत्त्वाकडे लाव ॥२॥ उन्मनी बाळी – मुली बरोबर टाळी-लग्न लाव व देहाबरोबरचा संबंध टाकून दे सर्वांच्या देहांत तो वनमाळी अखंड आहे ||३|| चंचल असा निवृत्ति आता स्थिर झाला असून तो आता हरिभजन करतांना काळ वेळ पाहत नाही. सतत हरिभजन करतो ||४||

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *