३१३ गगनीचा ईश गगनी समरसे
गगनीचा ईश गगनी समरसे । अवचिता काळपाश टाकीतुसे ॥ १ ॥
न लोटे पै निशी कैचा अहर्निशी । काळाचे कवेसि जनु आहे ॥ २ ॥
निवृत्ति म्हणे जन नेणतां पतन । हरिचरणीं मन स्थिर राहे ॥ ३ ॥
सरलार्थ:
निराकार आकाशांतील ईश्वर त्या निराकारामध्येच समरस होतो. व काळाचे बंधन एकदम टाकून देतो ॥१॥ रात्र संपत नाही मग दिवसरात्र कसे कळतील सर्व जग हे काळाच्या कवळीत मिठीत आहे ||२|| निवृत्तिनाथ म्हणतात – हरिचरणावर मन स्थिर झाल्यास त्याला पतन- अधोगती कळणारही नाही. त्याचे अ:धपतन होणार नाही || ३ ||