३१६ देवेविण ठावो नाही इये मही

देवेविण ठावो नाही इये मही । आत्मप्रकाश पाहीं बिंबलासे ।। १ ॥
वासना संगु करिते पांगु । जीवशिव भंगु कल्पनेचा ॥ २ ॥
सर्व जीवशिव हाचि धरा भाव । हारपला सर्व हरीं रुपीं ॥ ३ ॥
निवृत्ति तारक हरिरुप एक। हाचि एक विवेक एकतत्त्वें ॥ ४॥

सरलार्थ:

या पृथ्वीवर देवावाचुन दुसरे ठिकाणच नाही. त्याचाच आत्मप्रकाश सर्वत्र साकारला आहे ||१|| तरीही वासनेची आसक्ती हा त्रास करते व जीवाशिवाचा कल्पनाभेद अनुभवास येतो ॥२॥ हे सर्व जीव शिवस्वरूप आहे असा भाव धरा हरिस्वरूपांत सर्व भेद नाहिसा झाला आहे || ३ || निवृत्तिनाथ म्हणतात हा हरिच एक तारणारा आहे हाच विवेक-विचार एकतत्त्वात आहे ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *