३२५ आकारी दिसे निराकारी बसे
आकारी दिसे निराकारी बसे । तोचि हृदयीं दिसे अरे रथा ।। १ ।।
नाहीं तो आहे न दिसे ना पाहे । अवधा होउनि राहे तन्मयता ॥ २ ।।
स्वरूप उखर नमो मन सार । एकतत्त्व निर्धार हरि नांदे ॥ ३ ॥
निवृत्तिचें खूण अवघेंचि होणें । एका नारायणें भरलें दिसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
अरे बाबा हा आत्मा आकारांत दिसतो व निराकार स्वरूपांत राहतो व तोच हृदयात प्रगट होतो ।।१।। तो नाही व आहेहि आणि तो दिसत नाही व पाहतही नाही. सर्व वस्तुमध्ये तन्मय होऊन राहतो ॥२॥ स्वात्म स्वरूप ही माळरान जमीन असून मन हे सार आहे. एकतत्त्वाचा निश्चय करून श्रीहरि नांदत आहे ।।३।। एक आत्मतत्त्व सर्वरूपाने होणे हे निवृत्तिचे वर्म आहे. कारण हे सर्व एका नारायणानेच भरले आहे ।।४।।