३३० ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान

ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान। दृश्य द्रष्टा भान हरपती ।। १ ।।
पूजते पूजक पूजन सर्वभाव । अंती ब्रह्मएव ब्रह्मामाजी ॥ २ ॥
तेची हे धारणा तर्क सर्व पूर्णा । विवेकही खुणा सहजस्थिती ।। ३ ।।
निवृत्ति धारणा ब्रह्म सनातन । नित्य नारायण चिंती सुखें ॥ ४ ॥

सरलार्थ:

ब्रह्मस्वरूपस्थितीत ध्येय, ध्यानाचा विषय ध्यान- ध्यानाची वृत्ति व ध्याता ध्यान करणारा ज्ञेय-जाणण्याचा विषय, जाणण्याची वृत्ति व ज्ञाता- जाणणारा जीवात्मा ॥१॥ दृश्य, द्रष्टा व दर्शन या सर्वत्रिपुटी तसेच पूजाभाग पूज्य वस्तु व पूजाकरणारा हे सर्व ब्रह्मा स्थितीत नाहिसे होतात. व ब्रह्मदेवहि नाहिसा होतो ।। २।। तीच धारणा व सर्व अनुमाने तसेच विवेकाचे वर्म त्या सहजस्थितीत हरपून जातात ।। ३।। ते सनातन परब्रह्म हीच निवृत्तिची धारणा निश्चय आहे व तो नित्यानेच नारायणाचे चिंतन करीत आहे ||४||

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *