३३३ भक्तिचे महिमान भक्तासी फळले

भक्तिचे महिमान भक्तासी फळले । तीनकाळ केलें ब्रह्मार्पण ।। १ ॥
ब्रह्मार्पण राम संतोषरूप जाला । ब्रह्मचि रूप केला आपण्या ऐसा ॥ २ ॥
सर्वब्रह्म राम वेदादिक शब्द । आपण गोविंद सर्वांघटीं ॥ ३ ॥
निवृत्तिने ब्रह्म देखिलें परिपूर्ण । माजि सनातन ब्रह्मसुखें ॥४॥

सरलार्थ:

भक्तिचे महत्त्व भक्तांसच फलद्रुप झाले. म्हणून त्यांनी सर्वकाळ सर्व वस्तु ब्रह्मार्पण केले आहे ।। १ ।। त्या ब्रह्मार्पण करण्याने रामास संतोष झाला व त्या भक्तास आपणासारखेच ब्रह्मरूप केले ||२|| सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे असे वेदाचे वर्णन आहे. आत्मस्वरूप गोविंद सर्व भूतमात्रात आहे ||३|| निवृत्तिने ते ब्रह्म परिपूर्णत्वाने अनुभवले आहे. व त्या ब्रह्मसुखाने तो सनातन शाश्वत झाला आहे ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *