३४४ गगनीचा घन जातो पै वारेने
गगनीचा घन जातो पै वारेने । अवचिता पतन अधोपंथें ॥ १ ॥
अध उर्ध्व हरि भाविला कुसरी । प्रपंच बोहरी आपेआप ॥ २ ॥
निवृत्ति म्हणे जन हरिचें स्वरूप । काळाचें पै माप हरिनामें ॥ ३॥
सरलार्थ:
आकाशातील मेघ वाऱ्याने विरून जातो. तसे निकृष्ट मार्गाने अकस्मात पतन होते ।। १ ।। खाली व वर एक हरिच आहे अशी अद्वैत युक्तिने भावना केली तर प्रपंचाची आपोआपच समाप्ती होते.।।२।। श्रीनिवृत्ति म्हणतात हे सर्व जन श्रीहरिचे स्वरूप आहे. व त्या हरिच्या नामाने काळाचे माप घेता येते. त्याची शक्ती आजमावता येते. त्याचा पराभव होतो || ३ ||