३४६ एकेविण पाहा न दिसे हे द्वैत

एकेविण पाहा न दिसे हे द्वैत । एकी हेची मात वेदशास्त्रीं ॥ १ ॥
वेद शास्त्र सांगे आम्हा हा श्रीरंग । या नाहीं भंग आत्मपणें ।। २ ।।
आनंदैक सुख यासि नाहीं मोहो । भूतबाधा ग्रहो नामेचि तारी ॥। ३ ।।
निवृत्ति म्हणे पिता सकळतत्त्व रहितु । वेदशास्त्रीं दृष्टांतु पहा तुम्हीं ॥४॥

सरलार्थ:

एकत्वाच्या अधिष्ठानावांचुन द्वैत दिसतच नाही. म्हणून या द्वैताच्या बुडाशी एकच परमतत्व आहे. असा वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे || १ || वेदशास्त्रांनीच आम्हाला हा श्रीरंग सांगितला हा आत्मस्वरूप असल्याने याचा कधीहि नाश नाही. तो अविनाशी आहे ।। २ ।। हा एकमेव आनंदरूप सुख असल्याने यांस नाशिवंत वस्तुंचा मोह नाही. नामरूपात्मक भूतांची बाधा या नामानेच दूर होते ते नामच तिच्यातून तारते ||३|| निवृत्तिदेव म्हणतात – हा सर्वतत्त्वरहित असा या विश्वाचा पिता आहे. तुम्ही हा अनुभव वेद शास्त्रातूनहि घ्या ।।४।।

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *