३४८ नाही दिन मान नाही तेथ राम
नाही दिन मान नाही तेथ राम । अवघेचि गोत्रीं लावियेले ॥। १ ।।
उदो अस्तु ठेला वेदांसि अबोला । श्रुतीचा संपला वाद जेथे ।। २ ।।
तेथील तारक ब्रह्म निज सुख । केलासे विवेक सनकादिकीं ।। ३ ।।
निवृत्ति गयनी लाविली उन्मनीं । पावले निर्वाणि ब्रह्मपद ॥ ४ ॥
सरलार्थ:
त्या ज्ञानाच्या उन्मनी अवस्थेत दिवस व रात्र नाही व सर्व गणगोताचीहि वाट लावली आहे ||१|| तेथे चंद्र सूर्याचा उदय व अस्त थांबले असून वेदाबरोबर बोलणेहि थांबले आहे. फार काय उपनिषदाचाहि अनुवाद समाप्त झाला आहे ।।२।। एक आत्मसुख स्वरूप ब्रह्मच तेथे तारणारे आहे. हाच विचार सनकादिकांनी करून ठेवला आहे ॥३॥ गुरू गहिनीनाथांनी निवृत्तिस ही उन्मनी समाधी लावली असून तो मोक्षस्वरूप ब्रह्मपदास प्राप्त झाला आहे ॥४॥