३५१ प्रकृतिचेनी घाये घायवट नव्हे
प्रकृतिचेनी घाये घायवट नव्हे । आत्मारामसोये आत्मकळिके ॥ १ ।।
कळिका उन्मनी गोल्हाट कवळी । सत्रावीचे जवळी आत्मा स्वामी ॥ २ ।।
हे खुण घेई सोपानाजवळी । मनाची काळजी उरी नेदी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे ज्ञान सोपान सांग । विकल्पाचा पांग नाही नाहीं ॥ ४ ॥
सरलार्थ:
प्रकृति- मायेच्या संगाने आघाताने कधीही जखमी न होणारा असा हा आत्माराम आत्मतेजयुक्त आहे ।। १ ।। उन्मणिचे लावण्य असा हा आत्मा कुंडलिनीचे तेज कवटाळून घेतो व तो सत्रावी जीवन कले जवळच आत्मा स्वामी म्हणून राहतो ।। २।। हे वर्म सोपान देवाजवळून घ्यावे व मनाची काजळी मळ शिल्लक राहू देवू नकोस || ३ || निवृत्तिनाथ म्हणतात- ज्ञान हा सोपान सर्वांगीण जिना आहे तेथे विकल्पाचे परिश्रम मुळीच नाही ।।४।।