३५२ कळिकेसी ज्योत सामावली तेजी
कळिकेसी ज्योत सामावली तेजी । तैसा हरि हा सहजी सर्वगतु ॥१॥
सर्वत्र भजन हरी हेची खूण । हरी हा प्रमाण दों अक्षरीं ॥२॥
नित्य मुक्त एक आत्मतत्त्व दीप । हरी हा संकल्प करीजेसु || ३ ||
निवृत्ति सर्वदा हरिभजन हाट । नित्यता वैकुंठ अखंडित ॥ ४॥
सरलार्थ:
मोठ्या प्रकाशात दिपप्रभेसह ज्योत सामावून एकरूप होते. तसा हा श्रीहरि स्वभावतःच सर्व व्यापून आहे ।। १ ।। त्याला सर्व ठिकाणी पाहणे हेच हरिचे भजनाचे वर्म आहे ।।२।। एक आत्मतत्वाचा प्रकाशच नित्य मुक्त आहे. सर्व ठिकाणी एक हरिच आहे या अनुभूतिचा संकल्प कर ||३|| सर्वकाळ नेटाने हरिचे भजन हा नित्य व अखंड वैकुंठ आहे असे श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात ।।४।।