३५६ करूणा कल्लोळी अमृताची खोटी

करूणा कल्लोळी अमृताची खोटी । भरलीसे सृष्टि हरिच्या नामें ॥ १ ।।
सर्वही हा आत्मा वेद बोले सीमा । परि परब्रह्म रामकृष्ण ।। २ ।।
हरिविण डावो न दिसे सर्वत्र । हरिविण परत्र नाहीं नाहीं ॥ ३ ॥
निवृत्तिचे घर गयनी साचार । त्यामाजि उच्चार हरि आम्हां ॥ ४ ॥

सरलार्थ:

श्रीगुरूंच्या कृपाकल्लोळामृताने अमृताची तूट भरून काढली आहे. व हरिच्या नामाने सर्वसृष्टी भरून गेली आहे ॥१॥ सर्वब्रह्मस्वरूप हा आत्मा आहे असे वेद आत्म्याची व्याप्ति सांगतो व हरि हा परब्रह्मस्वरूप राम-कृष्ण आहे असे सांगतो ।।३।। सर्व ठिकाणी हरिवांचुन दुसरे स्थानच नाही व परलोकीही हरिवांचुन दुसरे काहींच नाही ||४|| गुरुगहिनी हेच निवृत्तिचे खरे घर-स्वरूप आहे. त्यामध्येच हरिनामाचा उच्चार हे आमचे ब्रीद – प्रतिज्ञा आहे ॥४॥

भावार्थ:

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *