३५७ जेथे पाहे तेथे व्यापिले अनंते
जेथे पाहे तेथे व्यापिले अनंते । तयाविण रिते कोण ठाय ।। १ ।।
गगनें वीण ठावो नाहीं जैसा रिता । तैसा या अच्युताविणें कांही ॥। २ ।।
तेथें माझ्या चित्ता करी रहिवासु । न करी उदासु ऐसियातें ।। ३ ।।
निवृत्तिने मन ठेविलें चरणीं । नामाची निशाणी अखंडित ॥ ४॥
सरलार्थ:
ज्याठिकाणी पाहावे त्याठिकाणी हरिने व्यापून टाकले असून त्याशिवाय रिकामे असे ठिकाण नाही ॥ १ ॥ ज्याप्रमाणे आकाशाशिवाय कोणते स्थान रिकामे नाही. तसेच या अच्युताशिवाय दुसरे काहींच रिते नाही ||२|| तसेच माझ्या चित्तात राहणे करावे. त्याला उदास करू नये ||३|| निवृत्तिनाथाने आतां मन गुरूचरणी ठेविले आहे व त्याचीच खूण अखंड नाम मुखात आहे ||४||