०७ देवीं देवेश शिवीं शिवेश
देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥ १ ॥
अष्टदिशा अगोचरे अष्टभुजा संहारकरे । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥ २ ॥
वदताती देव आणि सुरगण । उतरिलीं विमानें ठायीं ठायीं ॥ ३ ॥
सकळांनि पूजा केली आनंदानें । करिती कीर्तन अंबेपुढें ॥ ४ ॥
मंडपीं बैसले निवृत्ति नारायण । नारद कीर्तनें पुढे होत ॥ ५ ॥
नामा म्हणे देवी पहाती सकळ । पूजिती गोपाळ आनंदानें ॥ ६ ॥