०८ सप्तश्रृंगालागीं केली प्रदक्षिणा
सप्तश्रृंगालागीं केली प्रदक्षिणा । आतां नारायणा सिद्ध व्हावें ॥ १ ॥
२६ मार्गी आदिमाया पूजिली आनंदीं । म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥ २ ॥
चालतां चालतां दिवस झाले फार । होईल उशीर समाधीसी ॥ ३ ॥
तीन रात्र तेथें राहिले गोपाळ । मग म्हणती सकळ चला आतां ।। ४ ।।
नामा म्हणे देव बैसले गरुडावरी । उठावले भार वैष्णवांचे ॥ ५ ॥