११. सहसमुदायेसी उठावें शारंगधरा

सहसमुदायेसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ।। १ ।।
उठले वैष्णव आणि हृषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥ २ ॥
एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी । उत्सव निवृत्तिसी देवें केला ॥ ३ ॥
द्वादशी पारणें सोडितां वैष्णव । समारंभ देव करी तसे ॥ ४ ॥
राहिली ते शक्ति गळालें शरीर । देह अहंकार त्यागियेला ॥ ५ ॥
कोणाची करावी पुजा कोणे कोणा । अवघे नारायणा करणें येथें ॥ ६ ॥
नामा म्हणे देवा मुक्ताईची गती । सांडिलें निवृत्ति शरीरासी ।। ७ ।।

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *