१३. तुळसी बेल पुष्पें समर्पिली वर
तुळसी बेल पुष्पें समर्पिली वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ।। १ ।।
नारा विठा गोंदा पाठविला महादा। झाडावयां शेजा पुढे झाले ॥ २ ॥
सभोवती जागा झाडीली निर्मळ । अनादि हे स्थळ निवृत्तिराजा ॥ ३ ॥
सभोवती दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधी केली असे ॥ ४ ॥
अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आंत उतरू नये ॥ ५ ॥
नामा म्हणे हरि काय स्थळ चांगलें । दुर्वा दर्भ फुलें वाहियेलीं ॥ ६ ॥